अशासकीय सदस्य नियुक्ती समाज कल्याण कार्यालयात संपर्क करावा

अशासकीय सदस्य नियुक्ती समाज कल्याण कार्यालयात संपर्क करावा

भंडारा,दि.13 : राज्य दिव्यांगत्व संशोधन समितीकरीता अशासकीय सदस्यांची नावांसाठी नियुक्ती करीता अर्ज मागविण्यात येत आहे. उक्त समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून या कार्यक्षेत्रातील दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ञ व्यक्ती व दिव्यांगांच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांची नावे शासनास सादर करण्याच्या दृष्टीने प्रसिध्दी देण्यात येत आहे. ही बातमी ही प्रसिध्दी झाल्यापासून 14 डिसेंबर,2024 च्या आत समाज कल्याण कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेट देवून अर्ज सादर करता येईल.

करीता संबंधितांना या कार्यालयाशी संपर्क करणेसाठी या कार्यालयाचा पत्ता- जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद चौक येथे संपर्क साधावा असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ.संघमित्रा कोल्हे भंडारा यांनी कळविले

आहे.