जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन
भंडारा,27 : भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी संविधान दिनी काल दिनांक 26 नोव्हेंबर,रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी आदींसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.