बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत बालकांची आरोग्य तपासणी करा

बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत बालकांची आरोग्य तपासणी करा

भंडारा,दि.22: जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडी तील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येते.,आरोग्य तपासणीअंती संशयित हृदयरुग्ण लाभार्थी आढळून आलेले आहे. त्यानुषंगाने सदर संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्यांचे 2 डी ईको तपासणी शिबिर दिनांक 22 नोव्हेंबर, 2024 ला 39 संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्यांची जिल्हा रुग्णालय भंडारा येथे 2 डी ईको तपासणी करण्यात आली, त्यामध्ये एकुण 5 लाभार्थी शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरलेले असून 20 लाभार्थीना फॉलोअप व 14 लाभार्थीना शस्त्रक्रियेची गरज नसल्याची निदान झालेले आहे. करीता शस्त्रक्रीयेकरीता पात्र लाभार्थ्यांना शासनस्तरावर सामंजस्य करार झालेल्या रुग्णालयात मोफत पाठवून सर्व शस्त्रक्रीया, उपचार, निदान, भोजन व्यवस्था लाभार्थी व नातेवाईकांसाठी करण्यात येईल.

 

डिईआसी विभाग, जिल्हा रुग्णालय भंडारा येथे 2 डी ईको मशिन कार्यरत असुन संशयित 0 ते 18 वयोगटातील हृदयरुग्ण यांचाकरीता महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारला 2 डी ईको शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ही 2 डी ईको शिबिर मोफत असुन संशयित हृदयरुग्ण यांचाकडुन कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही करीता भंडारा जिल्हयातील संशयित हृदयरुग्ण यांनी सदर 2 डी ईको शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी केले आहे.