पालक मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थित जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळावा

पालक मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थित जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळावा

भंडारा दि. 4 : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे दिनांक 02/10/2023 ते 01/10/2024 पर्यंत वर्षभर महाराष्ट्रात महिला सशक्तीकरण धोरणाअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व सशक्तीकरण करणेकरीता विविध कार्यक्रम व महिलांचे कौशल्य मेळावे राबविण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनाचा महिला व बालकांना लाभ होईल या अनुषंगाने तसेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व उद्योजकता या विषयी तज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. महिला व बालकासंबंधित शासनाच्या इतर योजना महिलापर्यंत पोहचविण्याकरीता जिल्हास्तरीय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री, भंडारा यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक 05/10/2024 रोजी चैतन्य कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित केला आहे.

जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा (उमेद) तसेच राष्ट्रीय शहरी अभियान (NULM) यांच्या अधिनस्त बचत गटातील महिला या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.