गडचिरोली जिल्ह्यात कलम 36 लागू

गडचिरोली जिल्ह्यात कलम 36 लागू

गडचिरोली, दि.03: गडचिरोली जिल्हयात दिनांक 03 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पर्यत

नवरात्र/शारदा / दुर्गा उत्सव व दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी दसरा उत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहेत. सण/उत्सव शांततेत पार पाडावे याकरीता गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. त्याअर्थी जिल्हा पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढील प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे. अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार. ब) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ लोकांचे वागणूकीचे निर्बंधघालण्याचे अधिकार क) मिरवणूकीस बाधा होणार याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजां स्थानाचे जवळ लोकांचे वागणूकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार ड) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणे, ढोल ताशे वाजविणे इ. निर्बंध घालण्याचे अधिकार. इ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार. (ई) सार्वजनिक ठिकाणी / रस्त्यावर लाउड स्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार फ) कलम ३३, ३५, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ मुंबई पोलीस अधिनिमान्वये काढण्यात आलेला आदेशाची अमंलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक 03 ऑक्टोबर 2024 चे 00.01 वा. पासून ते दिनांक 14 ऑक्टोबर 2024 चे 24.00 वाजे पर्यत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील. असे जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी कळविले आहे.