मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातून 800 भाविक जाणार अयोध्येला
5 ऑक्टोबरला पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी
भंडारा दि.2 : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक 5 ऑक्टोबर रोजी अयोध्या करिता रवाना होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारा रोड, वरठी रेल्वे स्टेशन येथुन ही रेल्वे रवाना होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन दुरदृष्य प्रणालीव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही दुरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित राहतील.
प्रमुख अतिथीमध्ये खासदार पटेल,खासदार डॉ.प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी, नानाभाऊ पटोले, नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे उपस्थित असतील. जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 5 तारखेला सदर रेल्वे 11 वाजता वरठी रेल्वे स्टेशन वरून निघेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाराणसी येथे पोहचेल. तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन आणि वाराणसी दर्शन आणि मुक्काम असेल.त्यानंतर 7तारखेला सकाळी अयोध्या येथे पोहचेल आणि तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेणार आणि रात्री परतीचा प्रवास करेल. दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 11 वाजता भंडारा रोड रेल्वे स्टेशन येथे भाविक परत येतील. भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाज कल्याण विभागाचे कर्मचारी राहणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.