होमगार्ड नोंदणीसाठी अर्ज करा प्रक्रिया सुरु
भंडारा,दि.25 : जिल्हा समादेशक होमगार्ड भंडारा अंतर्गत येणा-या पथक व उपपथक भंडारा, साकोली, अडयाळ, पवनी, तुमसर, मोहाडी मधील पुरुष व महिलाची नवीन होमगार्ड नोंदणी २३ ऑगस्ट,.२०२४ रोजी सकाळी ०७ ते ११.०० या वेळेत जिल्हा पोलीस अधिक्षक, भंडारा यांचे कवायत मैदानावर नोंदणी प्रक्रिया आयोजीत केली आहे.त्याकरिता http://maharashtracdhg.gov.in/ mahahg/ enrollmentform.php या संकेत स्थळावर फक्त इंग्रजी भाषेतून दिनांक २६ जुलै, २०२४ ते १६ऑगस्ट,२०२४ पावेतो अर्ज मागविण्यात येत आहे.
तरी भंडारा जिल्हयातील रहिवासी असलेल्या पुरुष व महिला करिता सदस्य नोंदणी घेण्यात येणार असून होमगार्ड पात्रता निकष पुढील प्रमाणे आहे. उमेदवार हा वरील पथकातील पो.स्टे. अंतर्गत रहिवासी असावा पुरावा म्हणून मतदान कार्ड/आधारकार्ड, शिक्षण कमीत कमी १० वी पास, पुरावा शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशिट, वय २० ते ५० वर्षे, जन्म दिनांक पुराव्या करिता शाळा सोडल्याचा दाखला/एसएससी बोर्ड प्रमाणपत्र, पुरुषा करिता उंची १६२ से.मी., छाती न फुगवता ७६ से.मी. कमीत कमी ५ से.मी. फुगवणे आवश्यक व महिला करिता उंची १५० से.मी. तसेच उमेदवारास विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळा फेक या शारिरीक चाचण्या द्याव्या लागतील.
उमेदवार हे इतर कार्यालयात वेतनी सेवेत किंवा खाजगी सेवेत काम करत असल्यास कार्यालय प्रमुखाचे किंवा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक, माजी सैनिक, एनसीसी बी व सी प्रमाणपत्र, आयटीआय, जिल्हा स्तरीय क्रिडा मध्ये प्राविण्य प्राप्त, जडवाहन चालक परवाना धारक व इतर अन्य तपशिलाच्या पृष्टयार्थ सर्व संबंधित मुळ नोंदणीच्या ठिकाणी स्वखर्चाने यावे लागेल, तसेच नोंदणीच्या वेळी किंवा प्रवासात काही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड ही पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे यांनी कळविले आहे.