जागतिक लोकसंख्या दिवस साजरा

जागतिक लोकसंख्या दिवस साजरा

              भंडारा, 11 : जिल्हा रुग्णालय भंडारा येथे 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयम होते तर प्रमुख पाहुणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टैभुर्णव निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर कुभरे, स्त्रीरोग चिकित्सक डॉ शेलकी, जिल्हा सल्लागार NCD डॉ. हीलेश कुकडे उपस्थित होते.

          या प्रसंगी डॉ. शैलेश कुकडे यानी प्रस्तावनेत मागितले की भारत आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे व येणाऱ्या दिवसात ही लोकसंख्या झपाट्‌याने वाढणार आहे डॉ. मधुकर कुंभरे यांनी सांगितले की लोकसंख्या वाढीमुळे जागा, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादि क्षेत्रात समस्या उद्‌भवत आहेत. अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिपचंद सोयम यानी लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भयधारण निरोधक उपाययोजना तसेच दोन आपल्यात जास्त अतर ठेवणे आणि योग्य वेळी नसबंदी करण्याबत मार्गदर्शन केले व लोकसंख्या नियंत्रन करण्याचे सर्वांना आवाहन केले.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCD समुपदेशक श्रीमती प्राजक्ता पेठे तर आभार प्रदर्शन ॐ शैलेश कुकडे यानी केले. या कार्यक्रमाला सर्व प्रभारी अधीसेविका, NCD स्टाफ, नर्सिंग वि‌द्यालयाच्या वि‌द्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.