मृतकाची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन
भंडारा, दि. 05 : भंडारा पोलिस स्टेशन जिल्हा सामान्य रुग्णालय,भंडारा एक अनोळखी स्त्री वय अंदाजे 60 वर्षे वयोगटातील स्त्री हा मृत अवस्थेत मिळून आल्याने पोलिस स्टेशन भंडारा येथे नोंद असून पुढील प्रक्रिया तपासावर आहे.
मृतकाचे वर्णन : वय 60 ते 65 वर्षे, वर्ण- रंग-गहुवर्ण, उंची -5 फुट, केस-काळे पांढरे व बारीक, बांधा- सडपातळ, अंगात गुलाबी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाचे पायजामा घातलेली असून कानात बाजारू बिऱ्या,उजवे हाताचे पंज्यावर व उजव्या हाताचे अंगळयावर विंचु काढलेला गोंदण आहे.छातीवर मध्यभागी माता ची गाठ व छातीवर उजव्या बाजुस तिळ आहे. वरील वर्णनाचे मृतकाबाबत माहिती असल्यास पोलिस स्टेशन भंडारा मो.क्र.07184-252303 तसेच पोलीस निरीक्षक – गोकुळ सुर्यवंशी मो.क्र.9822299022 उपपोलिस निरीक्षक प्रवीण नितनवरे मो.क्र.9130426035 येथे संपर्क करावा.