नारी  शक्‍तीवंदन Run for Nation Run for Modi  कार्यक्रमाचे   चंद्रपूर  शहरात आयोजन

नारी  शक्‍तीवंदन Run for Nation Run for Modi  कार्यक्रमाचे   चंद्रपूर  शहरात आयोजन

भाजपा जिल्‍हा महानगर महिला मोर्चाचा  स्‍तुत्‍य उपक्रम

५०० पेक्षा अधिक महिलांनी नोंदणी सक्रीय सहभाग

विश्‍वगौरव   पंतप्रधान   नरेंद्र मोदी  यांच्‍या  संकल्‍पनेतील  नारी  शक्‍तीवंदन Run for Nation Run for Modi कार्यक्रमाचे  आयोजन  भाजपा जिल्‍हा महानगर महिला मोर्चा  तर्फे आयोजित करण्‍यात आले. यामध्‍ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदविला. हा स्‍त्री सक्षमीकरणाकरीता देशभरात राबविण्‍यात येतो आहे.

आज दिनांक 4 मार्च 2024 रोजी राज्‍याचे  वने, सांस्‍कृतिक कार्य व  मत्‍स्‍यव्‍यवसाय  तथा चंद्रपूर – वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री मा.ना.  सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख  मार्गदर्शनाखाली व भाजप महानगराचे अध्‍यक्ष राहूल पावडे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा जिल्हा महानगर महिला मोर्चातर्फे ‘नारी शक्तीवंदन’ Run for Nation Run for Modi या कार्यक्रमाचे आयोजन महिला मोर्चा चंद्रपूर महानगर अध्यक्षा सविता कांबळे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्‍त्री सक्षमीकरणाकरीता सातत्‍याने कार्य  करणार असल्‍याचे सविता कांबळे म्‍हणाले.

डॉ. प्राजक्‍ता  असवाद व जिल्‍हा पोलिस  उपअधिक्षक रीना जनबंधू यांच्‍या  शुभहस्‍ते हिरवी झेंडी दाखवुन नारी शक्‍तीवंदन Run for Nation Run for Modi या मॅरॉथॉनला  सुरवात करण्‍यात आली. गांधी चौक ते जटपूरा गेट ते गिरणार चौक व   परत गांधी   चौक  असा मॅरॉथॉनचा प्रवास करण्‍यात आला. यामध्‍ये  दोन  वयोगटात ही स्‍पर्धा घेण्‍यात आली.   त्‍यात पहिला वयोगट १४   ते ३५ वर्ष  व दुसरा गट ३५ वर्षाच्‍या पुढे असा घेण्‍यात आला. यामध्‍ये ५०० पेक्षा अधिक महिलांनी सक्रीय  सहभाग नोंदविला. यामध्‍ये प्रथम क्रमांक १४ ते ३५ वर्ष वयोगटामध्‍ये आचल कडूकर, द्वितीय क्रमांक तेजस्‍वीनी कांबळे व तृतीय क्रमांक रुचिका  नागरकर तर ३५ वर्षाच्‍या पुढील  वयोगटामध्‍ये  प्रथम क्रमांक विना  उकरे, द्वितीय क्रमांक जिजा    गुरले,  तृतीय क्रमांक सुरेखा मेश्राम यांचा आला.  यावेळी  विजेत्‍यांना  सन्‍मान  चिन्‍ह, प्रमाणपत्र व रोख रक्‍कम देऊन सन्‍मानीत करण्‍यात आले.  या कार्यक्रमाला महिला मोर्चा महामंत्री सुषमा नागोसे, कल्‍पना बगुलकर,  शिला चव्‍हाण, उपाध्‍यक्षा   शितल गुरनुले, माया उईके, चंद्रकला  सोयाम, कविता सरकार, वंदना जांभुळकर,  वनिता  डूकरे, कल्‍पना गिरडकर, उषा मेश्राम, सपना नामपल्‍लीवार, मोनिषा महातव, रेणुका घोडेस्‍वार, पुष्‍पा शेंडे, सुवर्णा लोखंडे, कोनिका  सरकार, संगीता बावणे, संगिता खांडेकर, आशा आबोजवार, प्रियंका  चिताडे, सुनिता  जयस्‍वाल, वंदना संतोषवार, भावना  नागोसे, वर्षा सोमलकर आदींनी  सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे संचालन  स्मिता रेभनकर आणि आभार  प्रदर्शन संगीता बावणे यांनी केले.