बँकेचे पैसे वाटप केंद्रावर असुविधा: ग्राहकांचा लाखोंचा व्यवहार रस्त्यावर …

बँकेचे पैसे वाटप केंद्रावर असुविधा: ग्राहकांचा लाखोंचा व्यवहार रस्त्यावर …
सिंदेवाही:
शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत खातेदारांना आधारकार्ड द्वारा पैसे वाटप केंद्र कल्पतरू कॉन्व्हेन्ट जवळ आहे. बँकेचे ग्राहकांना लाखोंचा व्यवहार रस्त्यावर पैसे वाटप केंद्र दिल्याने पासबुक धारक खातेदार व जेष्ठ नागरिकांना त्रासदायक आहे. त्या परिसरात बँक खातेदारांना रकमेची सुरक्षा व सुविधा उपलब्ध नाहीत.

तालुक्याचे ठिकाणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकृत पैसे वाटप सुविधा केंद्र आहे. बँकेचे सहकार्याने खातेदारांच्या पासबुकातील रकमेची आधारकार्ड द्वारे 20 हजार रुपये पर्यंत पैसे या वाटप केंद्र द्वारे केले जाते. बँकेचे व्यवहार ग्राहकांना सुरक्षा उपलब्ध होत नसल्याने पैसे व्यतिरिक्त ईतर कोणतेही कार्य करते वेळी त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मध्यवर्ती रस्त्याचे सिमेंट रोड कामामुळे केंद्रावर जाताना अडथळा होत आहे. बँकेचे रस्त्यावरील सुविधा केंद्राचे ठिकाणीं पैसे वाटप करताना , खातेदार, महिला ,पुरुष , ज्येष्ठ नागरिक यांना आधार कार्ड लिंक फेल निर्माण होत असल्याची ओरड सुरू आहे. ग्राहकांना अतिरीक्त कामाची सुविधेकरिता व रकमेची सुरक्षा नसल्याने वर्दळीच्या रस्ता ओलांडून पलीकडे जाताना खातेदार ग्राहकांना त्रासदायक झाले आहे.

– ज्येष्ठ नागरिकांनी बँकेचे परिसरात व्यवहार करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या सुविधा परिसरात पैसे वाटप केंद्रावर खातेदारांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे.कुठलीही सुरक्षा उपलब्ध नाही.आम्हाला या वयातील होणारे बँकेचे व्यवहार रक्कम, व इतर होणाऱ्या त्रुटी चे त्रासाबद्दल जबाबदारी कोणाची राहील. बँकेचे अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
– ज्येष्ठ नागरिक संघ सिंदेवाही