सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

गडचिरोली, दि.04: सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची 03 जानेवारीला जयंती निमीत्य माल्याअर्पन करुन प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर यांनी आपल्या मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहील्या महिला शिक्षीका तसेच मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. व वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतीबा फुले यांच्या सोबत झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाईना लिहायला वाचायला शिकविले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले यांनी 01 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. तसेच बालविवाह, केशवपन सती अशा वाईट प्रथांना विरोध केला. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांनी समाजातील स्त्रियांसाठी मोलाचे कार्य केले आहे. अशा या तेजस्वी, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विलास ढोरे, रुपाली काळे, सारीका वंजारी, पुरुषोत्तम मजुमदार तसेच सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली कार्यालयातील केंद्र प्रशासक, सुनिता पिंपळशेट्टीवार व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.