जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन 

जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन 

          भंडारा दि. 27 : 3 डिसेंबर2023 रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा 2023-24 चे औचित्य साधुन 28 व 29 डिसेंबर 2023 रोजी समाज कल्याण समिती,जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,भंडारा,यांचे जिल्हयातील शासकीय अनुदानित व कायम विना अनुदानित दिव्यांग शाळा व कर्मशाळातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सन 2023-24 या वर्षात जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा,छत्रपती शिवाजी जिल्हा क्रिडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगाना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद,भंडारा श्रीमती मनीषा कुरसंगे यांनी केले आहे.