नागपूर दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची तातडीची मदत व कुटुंबातील एका सदस्याला कंपनीने नोकरी द्यावी.
कंपनी मालकावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
याप्रकरणी तात्काळ राज्यशासनाने निवेदनाची मागणी करत विरोधी पक्षाकडून सभात्याग
नागपूर, १८
नागपूर जिल्ह्यातील बाजार गाव येथे संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचे उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या कंपनीत १७ डिसेंबर, २०२३ रोजी स्फोट होऊन ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी कंपनीच्या मालकांवर ३०२ चा गुन्हा दाखल करत मृतांच्या कटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत आणि कंपनीत नोकरी मिळावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ निवेदनाची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला.
स्थगन प्रस्तावाबाबत सदस्यांनी दिलेल्या सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. मात्र बाजार गाव येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चर्चा घडवून आणण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या विषयावर नियम ९७ अन्वये सूचना अध्यक्षांनी आधीच फेटाळणे, चर्चा न होवू देणे, स्थानिक सदस्यांना बोलू न देणे यामुळे विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला.
वडेट्टीवार म्हणाले, स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत काम करणारे कामगार प्रशिक्षण घेतलेले हवे परंतु येथे अकुशल कामगार अत्यल्प वेतनावर कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत.ज्याअर्थी, कंपनीकडून सुरक्षा निकषांची पायमल्ली करण्यात आली आहे जेथे सैन्यांचा दारुगोळा तयार होतो तेथे सुरक्षा निकषही पाळले नाही,
मुलींना प्रशिक्षण न देता कंत्राटी पद्धतीने कामाला लावण्यात येत असून कंपनीत कर्मचाऱ्यांचे शोषण होत आहे.त्यामुळे या कंपनीच्या मालकावर ३०२ चां गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली आहे.