राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पुनर्विकास करू नये

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पुनर्विकास करू नये

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई, १४

मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या शासकीय कार्यालयासाठी जागा अपुरी पडत आहे. तसेच काही शासकीय कार्यालयं खाजगी जागेत भाडे तत्वावर असल्याने शासनाच्या तिजोरीवर नाहक भार पडत आहे म्हणून या इमारतीच्या जागेवर असलेली इमारत पाडून याजागी नवीन प्राधिकरण पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.मात्र राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पुनर्विकास करू नये अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सभागृहात आज त्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशद्वारे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संसंस्थेच्या स्थलांतर या विषयाच्या अनुषंगाने विषय उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार म्हणाले, मुंबई राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था सद्यस्थितीत मोक्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, प्रशासकीय संस्थेचे अधिकारी तयार झाले आहेत. प्रशासकीय अधिकारी तयार होण्यासाठी असलेली ही संस्था सुरु असली पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रशासकीय सेवा घडविणाऱ्या अधिकाऱयांसाठी ही इमारत अनेक वर्षांपासूनची मोठी साक्षीदार आहे
काय करायचं ते करा, पर्यायी व्यवस्था करा, ही संस्था कोणत्याही परिस्थितीत मोडकळीस येऊ नये. विद्यार्थ्याची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पुनर्विकास करू नये अशी विनंती श्री. वडेट्टीवार यांनी केली.