सालेकसा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी अश्विनी वैष्णव ,रेल्वे मंत्री, यांची खासदार नेते यांनी घेतली भेट

सालेकसा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी अश्विनी वैष्णव ,रेल्वे मंत्री, यांची खासदार नेते यांनी घेतली भेट

गडचिरोली:- तालुका सालेकसा हा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील हा भाग काहीशे किलोमीटर अंतरावर आहे. लांब भागात देशातील सर्वात मोठा आदिवासी संसदीय मतदारसंघ आहे. हा भाग अत्यंत मागासलेला आणि आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त, दुर्गम आणि अविकसित क्षेत्र आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आणि गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा ही एकमेव रेल्वे स्टेशन आहेत, जे एक तहसील देखील आहे.

माझ्या लोकसभा मतदारसंघातील लोक मोठ्या प्रमाणातील संख्येने वडसा आणि सालेकसा येथील रेल्वे स्थानकांवरूनच रेल्वेने प्रवास करतात. परंतु, वडसा आणि सालेकसा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या न थांबविल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने वडसा व सालेकसा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांकडून होत आहे, मात्र आजतागायत त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांच्यात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबवण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी लक्षवेधीत अधिवेशन दरम्यान मी स्वतः रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन चर्चा करत निवेदन सादर केले.