सन 2023-24 वर्षात प्रवेशित/प्रवेशास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

सन 2023-24 वर्षात प्रवेशित/प्रवेशास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

गडचिरोली,दि.30: सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायीक पाठयक्रमातील, सेवा व निवणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक त्या दस्ताऐवजासह समितीस दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत दाखल केलेले प्रकरणे निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत. अश्या अर्जदारांनी त्यांच्या ईमेल. आय. डी. लॉगीनवरुन जात वैधता प्रमाणपत्राची प्रत काढून घ्यावी तसेच ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ईमेल. आय. डी. वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही. अशी सर्व प्रकरणे त्रृटीत असल्याने अर्जदारानी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. सदर त्रृटीची पुर्तता न केल्यास सर्वस्वी जबाबतदारी ही अर्जदाराची राहील.
तसेच 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थांनी जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन ना. धारगावे यांनी केले आहे.