जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी सुरू करूणे व प्रति क्विंटल रू. १००० बोनस जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
भंडारा प्रतिनिधी: जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी संस्थाकरिता जाचक अटी लावण्यात आलेल्या होत्या त्या अटी खरेदी संस्थांना परवडण्यासारख्या नसुन अटी रदद करण्यात आल्या तरीपण शासनाच्या व प्रशासनाच्या निष्काळजीपनामुळे धान खरेदी केंद्र वेळेवर सुरू न झाल्याने दिवाळी सनाच्या अभावी भंडारा जिल्ह्यातील ३०ज्ञ् शेतकन्यांनी खुल्या बाजारात कमी दराने धान विकले व शेतकन्यांचे नुकसान झाले मात्र दिवाळी संपल्यानंतरही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. तरी आपनांस निवेदन देण्यात येत आहे, की भंडारा जिल्हयातील धान खरेदी लवकरात लवकर सुरू करून शेतक-यांना प्रति क्विंटल रू. १०००/- बोनस देण्यात यावा जेने करून शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई होईल व न्याय मिळेल अन्यथा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस च्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशी चेतावणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या वतीने देण्यात आले .निवेदन देता वेळी जिल्हाध्यक्ष किरण अतकरी ,युवा जिल्हाध्यक्ष टेकचंद मुगुसमारे , एकनाथ फेंडर जि.प.सदस्य, राजू देशभ्रतार जि.प.सदस्य, नरेश ईश्वरकर जि.प.सदस्य, अजय मेश्राम भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष,मधूकर चौधरी, शहरअध्यक्ष ,ईश्वर कळंबे, दिलीप सोनुले,प्रफुल गायधने, मधूकर भोपे, युवराज अतकरी , राकेश शामकुवर, रितेश मारवाडे,बबन बुधे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.