पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
भंडारा दि.18
जिल्हयात “शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत दिनांक 20 नोव्हेंबर 2023, सोमवार रोजी सकाळी 11.30 वाजता चैतन्य पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय भंडारा येथे जिल्हास्तरीय मेळावा / कार्यक्रम घेण्याचे निश्चीत झाले आहे. सदर कार्यक्रम मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमूख उपस्थितीत घेण्यात येणार असून सदर कार्यक्रमात जिल्हयातील नागरीकांना विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधून जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतींना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांचेद्वारा दिनांक 20 नोव्हेंबर 2023, सोमवार रोजी सकाळी 11.30 वाजता चैतन्य पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये खालीलप्रमाणे नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून एकूण 1682 रिक्तपदे भरण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून जिल्हायातील नोकरीइच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
अ.क्र
उद्योजक/कंपनीचे नांव
पदनाम
रिक्त पदे
शैक्षणीक पात्रता
वयोमर्यादा
पुरूष
स्त्रि
एकूण
1
KAPSTON Facilities Management Limited Hydrabad
Security Guard
125
0
125
10th/12th/ Graduation
18 to 35
2
Sunsoor Srushti India Pvt.Ltd Company Wardha
Assistant Manager,
Development officer,
Branch Manager
35
50
85
10th/12th/ Graduation
18 to 45
3
Vaibhav Enterprises Nagpur
FITTER
115
0
115
SSC/HSC/ITI/ Diplome/ BSC
18 to 30
TURNER
105
0
105
MACHANIST
80
0
80
PAINTER
100
0
100
CARPENTER
55
0
55
WELDER
20
0
20
DRAUGHTSMAN
15
0
15
ELECTRICIAN
50
0
50
4
NavKisan Bio Plantec Ltd. Nagpur
Sales Executive
30
0
30
HSC/Diploma/ Graduate
18 to 35
5
Patle Eduskills Foundation Nagpur
Trainee
40
0
40
ITI in All Trade
18 to 30
Trainee
10
0
10
Diploma in Mechanical
18 to 30
Trainee
10
0
10
Any Degree
18 to 30
6
Auto Parts Manufacturing Industrial Group Waluj, Chhatrapati
Sambhajinagar
Apprenticeship Trainee
50
0
50
BE Mechanical
18 to 30
Apprenticeship Trainee
50
0
50
DME
18 to 30
Apprenticeship Trainee
50
0
50
ITI in All Trade
18 to 30
Apprenticeship Trainee
50
0
50
BSC/BA
18 to 30
Apprenticeship Trainee
100
0
100
HSC/SSC
18 to 30
7
Nav Bharat Fertilizers LLP Nagpur
Sales Trainee
10
0
10
SSC/HSC/ Agri Diploma
19 to 40
8
LIC Bhandara
Rural Career Agent
50
0
50
SSC/HSC/ Graduate
Above 21
Urban Career Agent
50
0
50
9
Colossal Skills Pvt. Ltd. (NAPS / NATS Aggregator Nagpur)
Apprentice
100
20
120
S.S.C. / H.S.C. / I.T.I. All Trade (Fresher)
18 to 40
Apprentice
10
02
12
Diploma / Degree Mechanical (Fresher)
18 to 40
10
SANJEEV AUTO COMPONENTS PVT LTD WALUJ,
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
APPRENTICE TRAINEE
100
0
100
BE MECH , DME, BA, BSC, 12TH, ITI
18 to 25
11
Mahindra & Mahindra Nagpur
APPRENTICE/EPP
200
0
200
H.S.C. / I.T.I. All Trade (Copa वगळुन)
18 to 27
सदर मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे. नोकरीइच्छुक युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज होत नसल्यास खालील लिंक ओपन करून गुगलफॉर्म भरुन अर्ज करावा किंवा क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
सदर मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण/शंका असल्यास कार्यालयाच्या 07184-252 250 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श्री.श.क.सय्यद मो.क्र.7620378924 यांचेशी संपर्क साधावा.
गुगल फॉर्मची लिंक : https://forms.gle/