जागतिक कौशल्य स्पर्धा-2024Ø स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे युवकांना आवाहन

जागतिक कौशल्य स्पर्धा-2024Ø स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे युवकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 7 : कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा व युवकांना जागतिक स्तरावर संधी मिळावी, याकरीता जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी https://kaushalya.mahaswayam.gov.in या पोर्टलवर सुरू असून स्पर्धेविषयीची माहिती सदर पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्पर्धेत भाग घेण्याकरीता ऑनलाईन नोंदणी : जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 मध्ये सहभाग घेण्यासाठी बांधकाम व इमारत तंत्रज्ञान, ट्रान्सपोर्टेशन व लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग व इंजीनिअरिंग टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन व कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्ह आर्ट्स अँड फॅशन तसेच सोशल व पर्सनल सर्विस या सेक्टर अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करावी.

सदर स्पर्धेचा शहरी व ग्रामीण युवक-युवतींनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.