चंद्रपुर मनपात आपत्ती धोके निवारण दिन साजरा

चंद्रपुर मनपात आपत्ती धोके निवारण दिन साजरा

चंद्रपूर १३ ऑक्टोबर – दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती धोके निवारण दिन म्हणून साजरा होतो.  या निमित्ताने आज चंद्रपुर महानगरपालिकेत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी आपत्ती प्रसंगी प्रतिसादास कटिबद्ध राहण्याच्या दृष्टीने संयुक्तपणे प्रतिज्ञा घेतली तसेच अग्निशमन विभागातर्फे मॉक ड्रील घेण्यात येऊन आग विझविण्यासंबंधी प्रात्यक्षिकंही करण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने १३ ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणुन घोषित केला आहे. राज्य शासनाने दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा करण्याविषयी सूचना निर्गमित केल्या आहेत.
त्यानुसार आपत्ती धोके निवारण दिन साजरा करण्यात आला व आयोजीत विशेष कार्यक्रमांतर्गत आग, पूर, भूकंप, वादळ, रासायनिक आणि औद्योगिक आपत्ती याविषयीचे माहितीपट अग्निशमन कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले.
या प्रसंगी अग्निशमन विभाग प्रमुख चैतन्य चोरे,स्टेशन फायर ऑफीसर अर्जुन तुंबेकर,लिडिंग फायरमॅन मोनीद येरेवार,फायरमॅन अमोल राऊत, फायरमॅन प्रज्वल लोदल्लीवार,केतन डाखरे व इतर कर्मचारी उपस्थीत होते.