वैयक्तिक  शेततळे योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा कृषी विभागाचे आवाहन

वैयक्तिक  शेततळे योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा कृषी विभागाचे आवाहन

        भंडारा,दि.20 : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळे निर्मिती योजनेचा  लाभ घेण्याचे आवाहन  कृषी विभागाने केले आहे. ही योजना शेतकऱ्यासाठी फायद्याची असून  या योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी  https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा,शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदाईक सेवा केंद्र, ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्रसारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

         या योजनेत सहभागी होण्याकरीता अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला  शेततळे ,सामुहिक शेततळे अथवा भातखाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे, या घटकाकरिता  शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

     तसेच या योजनेत सहभागी होताना संकेतस्थळावर उपलब्ध पर्यायापैकी फक्त इनलेट आउटलेटसह शेततळे या पर्यायावर  शेतकरी बांधवानी खुण करावी,या योजनेत शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदान मिळणार आहे 23 हजारापासून तर 75 हजार रुपये पर्यंत अनुदानाची रक्कम असणार आहे. शेततळे योजनेतून संरक्षित सिंचन शेतीला मिळावे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याने जास्तीत जास्त या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक कृषि अधिकारी  संगीता माने  यांनी कळविले आहे.