महसूल सप्ताहाचा थाटात समारोप लाभार्थ्याना वनहक्कांचे पटटेवाटप ,तर अनुकंपाधारकांच्या हातात थेट नियुक्ती आदेश

महसूल सप्ताहाचा थाटात समारोप लाभार्थ्याना वनहक्कांचे पटटेवाटप ,तर अनुकंपाधारकांच्या हातात थेट नियुक्ती आदेश

        भंडारा दि.7  ऑगस्ट : 1 ऑगस्टपासून सुरू असणा-या महसूल सप्ताहाचा आज नियोजन सभागृहात थाटात समारोप झाला.यावेळी 8 अनुकंपाधारकांना तलाठी संवर्गात  नियुक्ती आदेश देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे,जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी सुनिल विचंनकर, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, महसूल उपजिल्हाधिकारी विजया बनकर,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

         सर्वप्रथम या महसुल सप्ताहानिमीत्ताअंतर्गत राबविण्यात आलेल्या जनसंवाद, दाखले वाटप ,आरोग्य तपासणी,योगा व प्राणायमाचे वर्ग तसेच मतदार पडताळणी या उपक्रमांची माहिती विजया बनकर यांनी दिली.त्यानंतर या कार्यक्रमात तहसीलदार श्री.टेळे यांनी गेल्या दहा वर्षातील महसूल विभागाच्या बदललेल्या  कामकाजाची माहिती सादर केली.त्यामध्ये ई-चावडी,ई-फेर फार,ई-पीक पाहणी,ई-ऑफीस या सर्व ऑनलाईन सेवांमुळे विभाग अधिक गतीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

        अनुकंपाधारकांना थेट नियुक्तीमध्ये हिना वालोदे,दिपावली खोरगडे, रविंद्र पडोळे,अनील डोरले,कार्तीक सिरस्कर, शंतनु तुरणकर,पंकज डुंबरे यांना नियुक्ती आदेश देण्यात आले.विशेष म्हणजे आता महसुल विभागात अनुकंपाधारकांची यादी संपली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.यासह वनहक्काचे वैयक्तीक पटटेवाटपही लाभार्थ्याना करण्यात आले.तसेच  शिपाई ते लिपीक संवर्गातील पदोन्न्त झालेल्यां कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती आदेश देण्यात आले.

          ऑफीसर क्लब येथे महसूल सप्ताहांतर्गत सुरू असलेल्या योगा व प्राणायामाच्या वर्गासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या रमेश खोब्रागडे,शैलेश कुकडे,तसेच मंजुषा डवले,भोजराज झोंबाड आदींनाही सन्मानित करण्यात आले.

माजी राज्यमंत्री श्री.नाना पंचबुध्दे यांनी शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी महसुल विभागाने जलदगतीने सेवा देण्याची अपेक्षा व्यक्त केली .तर निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी यावेळी मेरी माटी,मेरा देश या उपक्रमांची माहिती दिली.

          या महसुल सप्ताहात कल्पकतेने राबविलेल्या सर्व उपक्रमांचे जिल्हाधिका-यांनी कौतुक केले.नविन नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत नागरिकांना तत्पर सेवा देण्याबाबत संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.