प्रतिपालकत्व समितीसाठी बाल संरक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीकडुन अर्ज आमंत्रित

प्रतिपालकत्व समितीसाठी बाल संरक्षण क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधीकडुन अर्ज आमंत्रित

गडचिरोली, दि.24:बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 19 जुन 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रतिपालकत्व (Fostercare) प्रायोजकत्व (Sponsorship) व अनुरक्षण (After Care) या संस्थेतर सेवाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रतिपालकत्व या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर समितीची रचना पुढीलप्रमाणे राहील. समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समिती (Sponsorship and Foster Care Approval Committee) गठीत करावयाचे असून सदर समितीमध्ये स्वयंसेवी संस्थेतील दोन प्रतिनिधी यांची निवड जिल्हाधिकारी यांचे स्तरावरुन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने स्वंयसेवी संस्थेतील दोन प्रतिनिधीची निवड करण्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील बालकांबाबत काम करणाऱ्या व समाजकार्याची आवड असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व समितीवर सदस्य म्हणून निवड करावयाची आहे. तरी इच्छुक स्वयंसेवी संस्थेतील व्यक्तीनी आपला अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्रमांक 1, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे प्रेस नोट प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 8 दिवसाच्या आत सादर करण्यात यावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.