आला पावसाळा..आरोग्य सांभाळा आरोग्य विभागाचे आवाहन

आला पावसाळा..आरोग्य सांभाळा आरोग्य विभागाचे आवाहन

 

भंडारा, दि. 14: जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मिळलेली माहिती नुसार पावसाळयात जलजन्य आजारांच्या साधी प्रामुख्याने आढळताता.पावसाळयामध्ये पाण्याचे स्त्रोत विविध कारणामुळे दुषित पाणी पुरवठा,दुषित जलस्त्रोत,जनाट आणि गंजलेले नळ व गटारामधून जाणाऱ्या जलवाहिण्या नळ पाइप लाईन्स गळती,नळाचे कनेक्शन जमिनीच्या पातळी पेक्षा खोलगड्डयात असणे आवश्‌यक आहे.तसेच दुषित झाल्यामुळे गॅस्टो,अतिसार,कॉलरा,विषाणूजन्य काविळ,विषमज्वर इत्यादी आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाहे.

 

जलजन्य साथीचे आजार होऊ नये,यासाठी नागरीकांनी खालील बाबीवर घ्यावयाची काळजी

 

शुध्दीकरण केलेलेचे पाणी पिण्यासाठी वापरावे,पिण्याचेपाणी गाळून व दहा मिनिटे उकळून प्यावे,पिण्याचे पाणी झाकून ठेवावे व पाणी घेण्यासाठी ओगराळयाच्या किंवा लांब दांडयाच्या भांडयाचा वापर करावा,पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरीन गोळया किंवा द्रावण वापरावे,जेवण्यापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत,शौचावरुन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, जुलाब झाल्यावर ओ.आर.एस.पाकीटे शासकीय व निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत तसेच घरात उपलब्ध असलेल्या द्रव पदार्थ उदा:ताक,शहाळयाचे पाणी,डाळीचे पाणी किंवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणत घ्यावेत,

 

तसेच साचलेल्या पाण्यातून चालणे टाळता येणे शक्य नसल्यास चालताना अनवाणी न चालता गमबुटांचा वापर करावा,व रोजच्या रोज तयार केलेले ताजे अन्न पदार्थाचे सेवन करावी,व दरवर्षी पावसाळयामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होवून हिवताप डेंग्यू,चिकुनगुन्या,जे.ई.सारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही मोठया प्रमाणात आढळतो.गावातील शेणाचे खड्डे,कचाऱ्याचे ढिग या ठिकाणी सॅन्डप-लॉय माशीची उत्पत्ती मोठया प्रमाणात झाल्याने विषाणुजन्य मेंदुज्वर आजाराची लागण लहान मुलांमध्ये 15 वर्षा खालील होण्याची शक्याता नाकारता येत नाही.

 

हिवताप रोगाचा प्रसार ॲनाफेलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. डेंग्यु हा विषाणु पासून होणारा आजार याचा प्रसार याचा प्रसार एडिस ईजिप्टास या जातीच्या मादी डासापासून होतो.चिकुणगुण्या आजार एडिस ईजिप्ट या डासामार्फत पसरते. जॅपनिज एन्सेफलॉयटीसया रोगाचा प्रसार क्युलेक्स टॉयटानी ओरीकस या विशीष्ट डासामार्फत पसरतो.हे सर्व साधारपणे ग्रामीण भागामध्ये भात शेती किंवा वराह पालनाच्या ठिकाणी आढळून येताते.व चंडीपूरा हो आजार सॅन्ड फलॉय नावाच्या मासी पासून होतो.हि मासी घरातील अडकळीच्या जागेतील भिंतीच्या भेगा मध्ये,गुरांच्या गोठया मध्ये व साचलेल्या कचऱ्यामध्ये ठिगाऱ्यामध्ये आढळून येते.

 

किटकजन्य आजार होऊ नये म्हणून नागरिकांनी खालील बाबीवर घ्यावची काळजी

 

यामुळे गावात असलेले निरुपयोगी वस्तु निकामी टायर्स,फुटकी भांडी इत्यादी ठिकाणी पाणी जमा होवू देऊ नये व त्यांची त्वरीत विल्हेवाट लावावी लागतात.व घरातील पाण्याचे साठे दर आठवडयात रिकामे करुन पाण्याची भांडी घासून,पूसून,कोरडी करुन भरण्यात यावी,जर आठवडयातून ठराविक दिवशी कोरडा दिवस पाळावा ज्या लोकांनी आल्या घरात परिसरात व प्रामुख्याने गुरांच्या गोठयात नियमीत स्वच्छता करावी,

 

जर शेणाचे खड्डे किंवा शेणखत गावापासून दुर राहतील याची प्रामुख्याने खबरदारी घ्यावी लागतात.त्यामुळे नाल्या गटारी बाहाती करावी.शोष खड्डयाद्वारे पाण्याचा निचरा करावा लागतो.रिकामे न करता येण्याजोग्या पाणीसाठयामध्ये व साचलेल्या पाण्यात केरोसीन किंवा टेमीफॉस द्रावण टाकावे.किटकापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करण्यात यावा,आणि झोपतांना शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकल्या जाईल असे कपडे वापरावेत.त्यामुळे उंदराचा प्रादुर्भाव कमी करावा.गावात फवारणी कार्यक्रम सुरु असताना आपल्या घरात व प्रामुख्याने गुरांच्या गोठयात आवर्जुन फवारणी करुन घ्यावी,त्यामुळे ताप असल्यास दुर्लक्ष करु नेय,व त्वरीत दवाखान्यात जावून डॉक्टरांचा सल्ला घ्यावी.असे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद यांनीच कळविले आहे.