शासन आपल्या दारी अंतर्गत मिन्सी येथे आयुष्यमान योजनेचे शिबिर

शासन आपल्या दारी अंतर्गत मिन्सी येथे आयुष्यमान योजनेचे शिबिर

 

भंडारा, दि. 19 : रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना देखील आयुष्यमान योजना ,विमा योजना,अटल योजनेबददल माहिती मिळावी व जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज पवनी तालुक्यातील मिन्सी ग्रामपंचायत येथे या योजनांबाबत शिबिर घेण्यात आले.

 

यात आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ रोहयो कामावर येत असलेल्या मजुरांपर्यंत पोचण्यासाठी तहसील कार्यालय पवनी, पंचायत समिती पवनी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले. आजच्या शिबिरामध्ये १५ मजुरांची नोंदणी करण्यात आली असुन अशाच स्वरूपाचे शिबिर ग्रामपंचायत कलेवाडा, कोंढा आणि बाम्हणी येथे सुद्धा राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पवनी यांनी दिली.

 

या शिबिरामध्ये पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोहयो कामावर काम करणारे मजूर त्यांना विमा योजनेचे महत्त्व तसेच शासनाद्वारे शासन आपल्या दारी या उपक्रमाअन्वये विविध योजनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी, पवनी वीरेंद्र जाधव व महेंद्र सोनोने तहसीलदार पवनी यांनी सांगितले.