एन. डी. पी. एस. अॅक्ट नुसार कार्यवाही कर्नाटक येथील युवकास अवैध गांजा सह अटक

एन. डी. पी. एस. अॅक्ट नुसार कार्यवाही कर्नाटक येथील युवकास अवैध गांजा सह अटक

 

दिनांक 3 जुन, 2023 रोजी पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथील ठाणेदार श्री जिवन राजगुरु सहायक पोलीस निरीक्षक यांना खबर मिळाली की, मुलचेरा ते गोंडपिपरी येणारी बस क्रमांक एम.एच. 33-टी-3841 रोहीत टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या बस मध्ये एक पिवळया रंगाचा टी-शर्ट घातलेला इसम त्याचे हातात निळया रंगाची बॅग घेवुन बसला आहे व त्याबॅग मध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन येत आहे अशा खात्रीशिर खबरेवरुन सपोनि श्री जिवन राजगुरु सोबत पोलीस स्टॉफ पोहवा मनोहर मत्ते ब.नं. 150, पोहवा शामराव पुलगमवार ब.नं. 2019, पोना जिवन आचेवार ब.नं.2122, पोना विलास कोवे ब.नं.2419, पोशि प्रेम चव्हाण ब.नं. 2211 यांचे गोंडपिपरी ते चंद्रपूर जाणाऱ्या राज्यमार्गावर तहसील कार्यालय गोंडपिपरीचे समोर नाकाबंदी करुन पंचासह छापा कारवाई केली असता सदर बस मध्ये इसम नामे अलोक आनंद मंडल वय 21 वर्षे रा. आर. एच. कॅम्प 2 पोष्ट जवलगेरा ता. सिंदानुर जि. रायचुर (कर्नाटक राज्य) हा व त्याचे ताब्यात एक निळया रंगाच्या बॅग मध्ये 6,456 किलो ग्राम गांजा अंमली पदार्थ किंमत 66500/- रुपयाचा माल अवैध रित्या बाळगुन प्रवास करत असल्याचे मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 (Narcotic Drugs and Psychotropic Substance Act 1985) कलम 8 (क), 20 (ब) (i) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि जिवन राजगुरु ठाणेदार पो.स्टे. गोंडपिपरी हे करीत आहे..

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री जिवन राजगुरु व गोंडपिपरी पोलीसांनी केली आहे. सक्षणाय खलनिर