डोंगरगाव येथे पिक प्रात्याक्षिक व शिवार फेरी कार्यक्रम संपन्न

डोंगरगाव येथे पिक प्रात्याक्षिक व शिवार फेरी कार्यक्रम संपन्न

 

भंडारा दि 17: तालुका बिज गुणन प्रक्षेत्र, डोंगरगाव (ता. मोहाडी) गव्हाचा पिक प्रात्याक्षिक कार्यक्रम व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डोंगरगावचे ज्येष्ठ नागरीक श्री. इलमे होते.

 

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी कृषि अधिकारी अविनाश कोटांगले साहेब यांनी मार्गदर्शन केले. भात पिकाव्यतिरीक्त शेतकऱ्यांनी फळबाग, भाजीपाला, दुध डेअरी, कुक्कुटपालन या सारखा जोडधंदा करावा तसेच महाबीज द्वारा उपलब्ध केळी व पपयाची लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी श्री. मिरासे साहेब यांनी कृषि विभागामार्फत राबवित असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

 

मंडळ कृषि अधिकारी रामटेक साहेब यांनी गव्हाच्या मॅक-6222 वाणाची उत्पादकता चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी. तसेच प्रात्याक्षिकमध्ये धान पीडीकेव्ही- तिलक सुपरफाईन वाणाचे वैशिष्टे सांगुन त्याची लागवड करण्यास सुचविले. कार्यक्रमाचे संचालन ए.एन. गावंडे जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, भंडारा यांनी केले. तर आभार प्रदर्शन कृषि पर्यवेक्षक खंडाईत यांनी केले. सदर कार्यक्रमास जवळपास 150 शेतकरी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे यशस्वी करणेकरीता पल्लवी बनसोड कृषि क्षेत्र अधिकारी, महाबीज भंडारा, श्रीमती गीता भोंगाडे, तालुका बिज गुणन प्रक्षेत्राचे श्री. मानकर व गावातील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले.