जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक १ उद्यापासून पुर्णपणे बंद..
जिल्हातील शाळेत शिक्षकांची भरती होत नसल्याने आणि बेमुदत संपावर शिक्षक गेल्याने या वर्षात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होनार आहे – अध्यक्ष शा.व्य.स.
महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निमसरकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र नागरी सेवा निवृती वेतन नियम १९८२ व नियम १९८४ पुन्हा पूर्वरत लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी दिनांक १४ मार्च २०२३ पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, राज्य सरकारी, निम -सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर संघटना, समन्वय समितीच्या बेमुदत संप आज पासून सुरू झालेला आहे.
त्यामुळे शाळेची व विद्यार्थ्यांची जिम्मेदारी शाळा व्यवस्थापन समिती यांचेकडे सोपविण्यात आली आहे.
परंतु शाळेची व संपूर्ण विद्यार्थी यांची जबाबदारी स्वीकारण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक १ चे शाळा व्यवस्थापन समितीने नकार देऊन यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी सिन्देवाही यांना आज दिनांक १४/०३/२०२३ रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात लिहिले आहे की जोपर्यंत शिक्षक शाळेची जबाबदारी स्वीकारणार नाही तोपर्यंत शाळां पुर्णपने बंद असनार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची कसलीही जबाबदारी असनार नाही. अशी माहिती अध्यक्ष शा.व्य.स. यांनी दिली आहे.