कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जागतिक महिला दिन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जागतिक महिला दिन

 

चंद्रपूर, दि. 09 : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र तिस-या बॅच मधील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसोबत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आकाशवाणी, चंद्रपूरच्या निवेदिका संगिता लोखंडे उपस्थित होत्या. सर्वात प्रथम स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान करणे आवश्यक आहे. तरच इतरांच्या मनात स्त्रियांप्रती सन्मान करण्याची भावना आपोआप जागृत झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्रीमती लोखंडे यांनी सांगितले.

 

तसेच यावेळी श्रीमती डोंगरे यांनी, स्वतः चा दृष्टीकोन बदला म्हणजे सर्व बदलेल व बदल हवा असेल तर प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यालयाच्या प्रमुख भाग्यश्री वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेत असलेला उमेदवारांना सातत्य, प्रयत्न आणि परिश्रम, या जोडीला नियोजित धेय्य असेल तर यश प्राप्त होईल, असे विचार मांडून सर्वांचे मनोबल वाढविले.

कार्यक्रमाचे संचालन दिव्या कुळमेथे यांनी तर आभार कांचन येरमे यांनी मानले. यावेळी केंद्रातील शिक्षक श्री गौरकार, सचिन भगत उपस्थित होते.