मधकेंद्र योजना जनजागृती मेळावा संपन्न

मधकेंद्र योजना जनजागृती मेळावा संपन्न

भंडारा, दि. 21: महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि विज्ञान महाविद्यालय पवनी यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच मधकेंद्र योजनेच्या जनजागृती मेळावाचे आयोजन हनुमान मंदीर सभागृह खैरी (तिर्री) पवनी येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती दुर्योधन सयाम तर प्रमुख उपस्थिती वनक्षेत्र सहायक अड्याळ पंचभाई, मंडळ कृषी अधिकारी एल.एम मेश्राम, उपसरपंच पुरूषोत्तम आकरे, उपसरपंच चिंतामण कुंभरे उपस्थित होते.

जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी देवीपुत्र यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजना याबद्दल सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. मधुक्षेमक पी.के.आसोलकर यांनी ग्रामोद्योग मंडळाची मधकेंद्र मधमाशा पालन योजना या बद्दल माहिती सर्व उपस्थित शेतकरी आणि युवकांना दिली. तर मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. भुवनेंद्र रहीले यांनी मधमाशीचे भारताच्या अन्न सुरक्षेतील महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला 49 शेतकरी व ग्रामीण युवकांनी सहभाग नोंदवला.