बुधवारी भंडारा जिल्ह्यात 16 कोरोना बाधित तर 12 रुग्णांना डिस्चार्ज
· एकूण डिस्चार्ज 66893
· एकूण पॉझिटिव्ह 68114
· क्रियाशील रुग्ण 79
· आज मृत्यू शून्य
· एकूण मृत्यू 1142
· रिकव्हरी रेट 98.21 टक्के
· मृत्यू दर 01.68
· आजच्या टेस्ट 604
· एकूण टेस्ट 618696
भंडारा, दि. 6 : जिल्ह्यात बुधवारी 16 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.6) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12 आहे. बुधवारी 604 व्यक्तींची चाचणी केली असता 16 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 79 सक्रिय रुग्ण आहे.
आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 893 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 114 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.21 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 18 हजार 696 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 114 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 08, मोहाडी 00, तुमसर 07, पवनी 01, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.