इटलीच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरे यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. 26 : इटलीचे भारतातील राजदूत व्हीनसेंन्झो डी ल्युका यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
यावेळी महावाणिज्यदूत अलसँड्रो डी मसी, उप महावाणिज्यदूत लुईगी कॅस्कोन तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी “महाराष्ट्र देशा”हे पुस्तक देऊन शिष्टमंडळाचे स्वागत केले तर राजदूतांनी “इटली”हे सचित्र पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिले.