स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारत कार्यक्रम

चंद्रपूर दि. 13 ऑक्टोबर: नेहरू युवा केंद्र संघटन, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय द्वारा दि. 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सिंगल युज प्लास्टिक वेस्ट, सुंदर व स्वच्छ गाव तसेच पारंपारिक स्वच्छ पाण्याचे स्त्रोत राखणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दि. 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नेहरू युवा केंद्राशी संलग्न असलेली युवा मंडळे, महिला मंडळे तसेच एन. एस.एस. एन.सी.सी व सामाजिक संस्थाचा सहभाग असणार आहे.
तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त युथ स्ट्रगल ग्रुप, खैरगाव (चांदसुर्ला) यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा, खैरगाव येथे स्वच्छ भारत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खैरगाव सरपंच माधुरी सागोर, उपसरपंच अनिल डोंगरे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मामीडवार, पोलिस पाटील शंकर ताजणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण दहिवलकर तसेच युथ स्ट्रगल ग्रुपचे अध्यक्ष प्रतिक मेश्राम उपस्थित होते.
स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छता करण्यात येऊन गावातील प्रत्येक घरातून प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यासोबतच गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत प्लास्टिक निर्मूलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.