जिल्हास्तरीय ऋण प्रचार व प्रसार मेळाव्याचे 8 ऑक्टोबरला आयोजन

जिल्हास्तरीय ऋण प्रचार व प्रसार मेळाव्याचे 8 ऑक्टोबरला आयोजन

 भंडारा,दि.06:- अग्रणी जिल्हा व्यवस्थापक भंडारा यांचेकडून सणासुदीच्या काळात कर्ज पुरवठा वाढविण्याकरिता व कर्ज योजनेची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याकरिता (Credit Outreach Campaign) ऋण प्रचार, प्रसार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 08 ऑक्टोबर व 14 ऑक्टोबर 2021 रोजी आरसेटी (RSETI) भंडारा (मनरो शाळेच्या बाजूला) येथे सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम जिल्हास्तरीय आहे व या मेळाव्याला जिल्ह्यातील प्रत्येक बँकेचे जिल्हास्तरीय अधिकारी व संबंधित शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहणार असून बँकेच्या कर्ज योजना संबंधी माहिती, मार्गदर्शन देण्याकरिता त्यांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांचे हस्ते होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी केले आहे.