आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 ऑगस्ट : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयांतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली व सिंदेवाही या 10 तालुक्यातील आदिवासी  लाभार्थ्यांकडून शबरी घरकुल योजनेकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
शबरी घरकुल योजनेचे अर्ज शासकीय आश्रम शाळा, शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह तसेच कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध आहेत. आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करून अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, गाव नमुना-8, ग्रामसभेचा ठराव व इतर आवश्यक परिपूर्ण कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावे व शबरी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.