नगरपंचायत सिंदेवाहि येथे नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने आणि महिला सदस्यांच्या वतीने नारळ पुर्णिमा आणि रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

नगरपंचायत सिंदेवाहि येथे नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने आणि महिला सदस्यांच्या वतीने नारळ पुर्णिमा आणि रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

काल दिनांक 23/08/2021 रोज सोमवारला नारळ पुर्णिमा रक्षाबंधन या सनाचे औचित्य नाजुक नात्याचे दृढ़ रेशिंमगाठिच्या डोरी सारखे मजबूत रहावे या उद्देशित भावनेने नगरपंचायत सभागृहात आशा विजय गंडाटे अध्यक्ष न.प. सिंदेवाहि यांच्या सहकार्याने आणि सन्माननीय नंदा बोरकर सभापति महिला-बालकल्याण विभाग, पुष्पा वामन मडावी माजी सभापति म. बा विभाग , प्रणाली अशोक जीवने, सोनू योगेश कोकुलवार महिला गट अध्यक्षा यांच्या सहकार्याने परंपरागत पद्धतीने अतिशय भावनिक साद देत साजरा करण्यात आला.
प्रामुख्याने सक्खे जरी नसले तरी पक्के भाऊ म्हणून सदर रक्षाबंधन आणि नारळ पुर्णिमा या कार्यक्रमास बहिनींच्या भावनिक सादेला प्रतिसाद देत आवर्जून सुनील उट्टलवार स्वीकृत सदस्य तथा अध्यक्ष स. भा. गिरनी सोसायटी, भुपेश लाखे ज्येष्ठ नगरसेवक न.प. सिंदेवाहि तथा अध्यक्ष ग्रामीन शिक्षक सोसायटी सिंदेवाहि, पंकज आसेकर आस्थापना अधीक्षक,पाटिल रोखपाल,संजय रामटेके, सुधाकर निकुरे, संजय वाकड़े,मारबते, कांबले ,विनोद काटकर, सुधीर ठाकरे , इत्यादि मान्यवरांसह युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष निराश्रित-निराधार लोकेसेवा प्रकल्प (नगरसेवक) सिंदेवाहि यांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिति होती, सदर कार्यकर्माची सुरुवात सर्वप्रथम आशा गंडाटे यानी भुपेश लाखे, सुनील उट्टलवार, युनुसभाई शेख यांना गोंदा राखी बाँधून केली. सोबतच उपस्थित नंदा बोरकर, प्रणालि जीवने, गिता नागापुरे, नंदा रगड़े, कंबलवार सर्वाणि उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी व कर्मचारी वर्गास राखी बाँधून आणि मिठाई वाटून कार्यक्रम साजरा केला.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीते करिता गिता नागापुरे, नंदा रगड़े, कंबलवार , मारबते इत्यादिनी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.