चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित

चंद्रपूर दि.20 जुलै: महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोरोना  वर्तणूक विषयक सूचना निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर चंद्रपूर जिल्हयाअंतर्गत शिबिर कार्यालय कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये 50 शिकाऊ अनुज्ञप्ती व 70 पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

ही आहेत शिबिराची स्थळे:

दि.20 जुलै 2021 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा, 23 जुलै रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 27 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर तर 30 जुलै रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.