चंद्रपुर येथील ड्रग्य माफिया कडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा माल हस्तगत

चंद्रपुर येथील ड्रग्य माफिया कडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा माल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची कारवाई

दिनांक 27/10/2025 रोजी उपविभाग, चंद्रपुर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस पथक सोबत पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करणे कामी खाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे खबर दिपक कृष्णा वर्मा, वय-28 वर्ष, धंदा-चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, गुल रोड, चंद्रपुर तसेच आरोपी आशिष प्रकाश वाळके, वय-30 वर्ष, धंदा-मजूरी, आंबेडकर कॉलेज जवळ, मित्रनगर, चंद्रपुर हे पांढ-या रंगाचे डिजायर कार के. एम. एच.-49 एएस-2704 ने फॉरेस्ट अकादमी, मुल रोड, चंद्रपुर येथे येत आहे अशा खबरे वरून मुल रोड, फॉरेस्ट अकादमी समोर नाकाबंदी करून असतांना पांढ-या रंगाचे डिजायर कार कं. एम.एच. -49 एएस-2704 येत असतांना दिसुन आली. सदर वाहनास थांबवुन वाहना मधील दिपक कृष्णा वर्मा, वय-28 वर्ष, धंदा-चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मुल रोड, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन 160 gm MD (मेफोडॉन) इग्स पावडर सह पांढ-या रंगाचे डिजायर कार के. एम. एच.-49 एएस-2704 असा एकुण 16,12,500/- रु माल जप्त करून आरोपीस विरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे एन.डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला. नमुद गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांकेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा / सतिश अवयरे, पोहवा / रजनिकांत पुष्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, पोशि/हिरालाल गुप्ता, पोशि/अजित शेडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

जाहीर आवाहन

नागरिकांना या द्वारे आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही प्रकारची अमली पदार्थाचे सेवन, विक्री, बाळगणे बाबत माहिती असल्यास किंवा शंका असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्षाचे 112 यावर कॉल करुन माहिती देवुन चंद्रपूर जिल्हा नशा मुक्त करण्यास पोलीसांना सहकार्य करावे.