सिंदेवाही रेल्वे स्थानक येथील नवनिर्मित मालधका झाल्यास जनआंदोलन करणार… / समर्थनासाठी पुरोगामी पत्रकार संघ शाखा -सिंदेवाही यांनाही दिले निवेदन 

सिंदेवाही रेल्वे स्थानक येथील नवनिर्मित मालधका झाल्यास जनआंदोलन करणार…

समर्थनासाठी पुरोगामी पत्रकार संघ शाखा -सिंदेवाही यांनाही दिले निवेदन 

सिंदेवाही रेल्वे स्थानक येथील होणाऱ्या नवनिर्मित तालुक्यापासून भविष्यात होणाऱ्या प्रदूषणामुळे नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही शहर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकतो त्यासाठी सिंदेवाही शहरातील नागरिक, समाजसेवक, व्यापारी, विविध राजकिय पक्ष, संघटना आता एकत्रित आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सिंदेवाही रेल्वे स्थानक येथे मालधक्का होऊ नये म्हणून नागरिकांची मागणी होत होती, परंतु या कामासाठी पुढाकार कोणी घ्यायचा म्हणून काही नागरिकांनी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत चे नगरसेवक तथा सभापती पंकज नन्नावरे यांना माहीती दिली, सिंदेवाही रेल्वे स्थानक परिसराचे म्हणजे प्रभाग क्रमांक -२ चे नगरसेवक असल्याने नागरिकांनी पुढाकार घेण्याची जबाबदारी दिली.

पंकज नन्नावरे यांनी सिंदेवाही शहरातील नागरिक, समाजसेवक, व्यापारी, विविध राजकिय पक्ष,संघटना, पत्रकार यांचेशी चर्चा करुन सिंदेवाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत सिंदेवाहीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, जिल्हाधिकारी,राज्याचे रेल्वे अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे.

सिंदेवाही रेल्वे स्थानक येथील मालधका झाले तर शहरातील प्रदूषण वाढेल व त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल, त्यामुळे समंधीत प्रशासनाने सिंदेवाही रेल्वे स्थानक येथे मालधक्का न करता सिंदेवाही तालुक्यापासून दुर जंगल परिसरात करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मुल रेल्वे स्थानक येथे मालधक्का होऊ नये म्हणून मुल शहरातील व्यापारी, विद्यार्थी, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभे करून मालधक्का निर्माण होण्यास विरोध केला होता व त्यांना यशही आले. जिथे मालधक्का आहे तेथील नागरिकांचे जगणे अनुभवले तर भविष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला निश्चित लक्षात येईल, त्यामुळे सिंदेवाही शहरातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, संघटनेनी एकत्र येऊन मालधक्केचा विरोध केला पाहिजे – पंकज नन्नावरे, नगरसेवक