स्थानिक गुन्हे शाखेची अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई – 38 पेट्या देशी दारू जप्त
दिनांक 02/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाणे कोरपना हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, एका टाटा सुमो वाहनाद्वारे अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी वाहून नेली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे माथा फाटा, कोरपना रोड येथे पाळत ठेवून संबंधित टाटा सुमो वाहन (क्र. MH 14 CG 6143) ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पाहणी केली असता देशी दारूच्या प्रत्येकी 90 एम.एल. च्या 38 पेट्या (एकूण 38,000 नीप) किंमत अंदाजे ₹1,52,000/- व टाटा सुमो वाहन किंमत अंदाजे ₹5,30,000/- असा एकूण मुद्देमाल ₹6,82,000/- किमतीचा जप्त करण्यात आला.
या कारवाईत खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे –
1. प्रफुल पुरुषोत्तम खेलुरकर, वय 25 वर्ष, रा. आंतरगाव, ता. कोरपना
2. प्रशांत नारायण मेश्राम, वय 25 वर्ष, रा. वानसडी
3. अमर व्हेट्टी, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर
4. आरिफ शेख, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर
वरील आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे कोरपना येथे गुन्हा क्रमांक 240/2025 कलम 65(अ)(ई), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पथक
सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पो.हवा. स्वामीदास चालेकर, पो.हवा. किशोर वैरागडे, पो.शी. गोपीनाथ नरोटे, पो.शी. शेखर माथनकर, चालक पो.शी. ऋषभ बाराशिंगे
ही कारवाई राजुरा व गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली असून पुढील तपास पोलीस ठाणे कोरपना करीत आहे.