रामनगर पो.स्टे. हद्दीतील धोकादायक सराईत गुन्हेगार नामे विनित नानाजी तावाडे याचेविरुध्द MPDA Act अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द ची कारवाई
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांनी जिल्हयातील धोकादायक सराईत गुन्हेगार ज्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न करणारे, विनापरवाना हत्यार बाळगणारे, दुखापत करणारे, बलात्कार करणारे, जाळपोळ व जिवे मारण्याची धमकी देणारे, अवैध धंदे करणारे विरुध्द MPDA Act अन्वये प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवुन त्याचा नियमित पाठपुरावा करुन अशा प्रकारच्या गुन्हे करणारे धोकादायक इसमास स्थानबध्द करण्याची मोहीमे अंतर्गत पो.स्टे. रामनगर हदीतील अशाच प्रकारचे गुन्हे करणारा आणि सर्व सामान्य जनते मध्ये दहशत व भितीचे वातावरण निर्माण करुन जनजिवन विस्कळीत करणारा पोलीस स्टेशन रामनगर आणि बल्लारपूर येथे एकुण १५ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार व धोकादायक इसम नामे विनित नानाजी तावाडे, वय २८ वर्ष रा. बापट नगर, ओम भवन जवळ, चंद्रपूर याचे विरुध्द श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोनि श्री आसिफराजा शेख यांनी सदर इसमावर प्रतिबंध व्हावा म्हणुन कलम ३ (१) महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २००९, २०१५) MPDA Act अन्वये कारवाईचा अहवाल तयार करुन पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविल्याने श्री अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी दस्ताऐवजाची पडताळणी करुन सपोनि श्री योगेश खरसान ठाणेदार पोस्टे कोठारी यांचेकडुन स्थानबध्द प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले असता आज दिनांक २ ऑगष्ट २०२५ रोजी नमुद इसम नामे विनित नानाजी तावाडे यास MPDA Act चे तरतूदीनपुर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी स्थानबध्द आदेश मंजुर केल्याने सदर इसमा त्वरीत प्रभावाने जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे दाखल करुन स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पो. नि. श्री आसिफराजा शेख, पोस्टे रामनगर, पो. नि. श्री अमोल काचोरे, स्थागुशा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री योगेश खरसान, पोस्टे कोठारी, पोउपनि श्री सुरेंद्र उपरे, पोहवा संजय देशवाले, पोहवा अरुण खारकर, पोअं. परवेज शेख, पोअं. अनिल जमकात, मपोहवा मनिषा मोरे, मपोअं ब्युल्टी साखरे पोस्टे रामनगर आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.