अवैध शस्त्र बाळगणारे विधी संघर्ष बालकासह एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंद

अवैध शस्त्र बाळगणारे विधी संघर्ष बालकासह एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंद

एक दुचाकी वाहन व अवैध धारदार शस्त्र असा एकूण ७५,५००/- रू.चा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन मुल ची कामगिरी

दिनांक २६/०७/२५ रोजी वेळ २०:३० वाजता दरम्यान पोलीस स्टेशन मुल DB पथक पो.स्टे. हद्दी मध्ये पेट्रोलिंग दरम्यान मुल शहर, चंद्रपूर – मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय – २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकां मध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे.