सिंदेवाहीतील निर्माणधीन रेल्वे उड्डाण पुलाला धर्मविर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याची मागणी.
सिंदेवाही तालुक्याचे ठिकाण असलेले प्रमुख रेल्वे मार्गावर रेल्वे गेट जवळ उड्डाण पुलाचे काम सुरू झालेले आहे. निर्माणधीन रेल्वे उड्डाण पुलाला धर्मविर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याची नागरिकांचे, तसेच जनतेचे वतीने स्वाक्षरी केलेले निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे गेटचे निर्माणधीन रेल्वे उड्डाण पुलाचे करोडो रुपयांचे विकास निधीतून काम सुरू झालेले आहे. या उड्डाणपुलाला धर्मविर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याचे नागरिकांचे स्वाक्षरी केले असलेले मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार संदीप पानमंद यांचे मार्फत तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या परिसरात महाराजांचे नावाने वास्तू किंवा पुतळा नाही. शहरातील सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत हद्दीत निर्माणधीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरळीत सुरू आहे. या पुलाचे वर्षभरात काम पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलाला धर्मविर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्यात यावे अशी जनतेची मागणी असल्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री अशोक उईके , जिल्हाधिकारी यांना निवेदपत्र पाठविली आहे. या प्रसंगी, नागराज गेडाम माजी सभापती, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, पैठणकर , राहुल कावळे, प्रदीप चावरे, नवले सर, बुरले, पेशट्टीवार , शुभम भिंगेवार तहसील कार्यालय येथे उपस्थित होते.