महाराष्ट्रात खडबड माजवणाऱ्या बोगस् औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा – डॉ. श्रीकांत बनसोड

महाराष्ट्रात खडबड माजवणाऱ्या बोगस् औषधी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा – डॉ. श्रीकांत बनसोड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. श्रीकांत बनसोड यांची मागणी.

महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील तसेच नागपूर मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी होत असलेल्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस औषधांची पुरवठा आणि साठा आढळून आल्याची बातमी प्रसिद्ध झाली, गोरगरीब रुग्णांच्या सेवेत शासकीय रुग्णालया द्वारे गोरगरीब रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात औषधे भेटावी या उद्देशाने शासकीय रुग्णालयात औषधांचा वाटप केला जातो, परंतु अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात तसेच नागपूरच्या रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा पुरवठा करण्यात आल्याने एकच खडबड उडाली आहे. बोगस औषधांच्या वाटपामध्ये गुजरात येथील व कोल्हापूर येथील काही कंपन्या यांचे नाव समोर आले असून त्यांनी पुरवठा केलेल्या औषधांमध्ये योग्य प्रमाणात त्या औषधांचे कंटेंट नसल्याचे व गुणवत्ता शून्य असल्याचे निदर्शनात आल्याने, अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सोशल मीडियातून सुध्या महाराष्ट्रात जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषारी औषधं साठा ह्या सदराखाली बातम्या प्रसिद्ध झाल्याने, आमच्या जिल्हयातील गोर गरीब आदिवासी रुग्ण पुरते धास्तावलेले असून, शासकिय रुग्णालयातील सेवेला आणि औषधांना घाबरत असून, त्याचा वापर करताना शंका ना पेव फुटलेला आहे. अशातच अन्न व औषध प्रशासन व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून केवळ या दोन तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सदरच्या कंपन्यांकडून औषध साठा पुरवठा झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरच्या बोगस औषधांच्या वापराने आणि सेवनाने ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेच्या आरोग्याचा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलेला आहे. बोगस औषध देऊन रुग्णांची बोडवन करण्याचा प्रयत्न, झाल्याचे निदर्शनात येत आहे, गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब जनता लाभ घेत असल्याने गडचिरोली जिल्ह्यामध्ये या कंपन्यांकडून सदर बोगस औषधांचा पुरवठा झाला किंवा नाही झाला असल्यास नेमका त्यांचा साठा किती आहे? याची समिती नेमून चौकशी व्हावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या, माजी जिल्हा समन्वयक, डॉक्टर श्रीकांत बनसोड यांनी शिवसैनिकांचे सोबतीने निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न जर प्रशासनाने केला तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आलेला आहे. निवेदन

देण्याकरिता देसाईगंज तालुक्याचे उपतालुकाप्रमुख श्री विलास ठाकरे, विभाग प्रमुख श्री होमराज पाटील गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मंडल समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते