जिल्हा परिषद भंडारा भरती आरोग्य सेवक दस्ताऐवज पडताळणी 26 जुलैला

जिल्हा परिषद भंडारा भरती

आरोग्य सेवक दस्ताऐवज पडताळणी 26 जुलैला

            भंडारा,दि.22 : जिल्हा परिषद भंडारा पदभरती 2023 अंतर्गत आरोग्य सेविका (महिला) व आरोग्या सेवक (पुरुष) यासंवर्गाचे निकाल जि.प.भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ bhandarazp.org दिनांक 17 जुलै, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.

            त्या अनुषंगाने आरोग्य सेविका (महिला) संवर्गात गुणवत्ते नुसार पात्रता धारण करित असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवजत पासणी दिनांक 26 जुलै, 2024 रोजी सकाळी 10.00 ते 12.00, दु.12.00 ते  2.00, दु.2.00 ते 4.00 व दु. 4.00 ते 6.00 अशा चार सत्रात केली जाणार आहे. तसेच आरोग्य सेवक (पुरुष) 40% संवर्गात गुणवत्ते नुसार पात्रता धारण करित असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी दिनांक 29 जुलै, 2024 रोजी सकाळी 10.00 ते 12.00, दु.12.00 ते  2.00 व दु.3.00 ते 5.00 अशा तीन सत्रात केली जाणार आहे. त्या बाबतचे नोटीस उमेदवाराने आवेदन पत्रात नमूद केलेल्या  ई-मेलवर पाठविण्यात येत आहे. करिता उमेदवारांनी त्यांचे आवेदन पत्रात नमूद केलेले ई-मेलनियमित तपासत जावे. पाठविलेल्या नोटीसची प्रिंट काढून घ्यावी व त्यामध्ये नमूद केल्या प्रमाणे दस्तऐवज पडताळणी करिता उपस्थित राहावे.असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा विभागानी कळविले आहे.

दस्तऐवज पडताळणीचे ठिकाण- जिल्हा परिषद भंडाराचे सभागृह

दिनांक – 22 जुलै,2024