शेतकऱ्यांनी आर्थिकस्तर उंचविण्यासाठी तुती रेशीम उद्योगाकडे वळावे

तुती रेशीम उद्योग कार्यशाळेला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद

शेतकऱ्यांनी आर्थिकस्तर उंचविण्यासाठी तुती रेशीम उद्योगाकडे वळावे

भंडारा, दि. 17: जिल्हयात तुती रेशीम उदयोगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आज आयोजित कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शेतकऱ्यांनी फक्त शेती न करता रेशीम शेती उद्योग करण्यासाठी कश्या पद्धतीने तुती रेशीम उद्योग केला पाहिजे,असे आवाहन माजी संचालक रेशीम संचालनालय डॉ.एल.बी.कलंत्री यांनी केले.

 

तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील दोनशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यशाळेला माजी संचालक, रेशीम संचालनालय, तथा माजी विभाग प्रमुख कृषी विस्तार विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कॅप्टन डॉ. एल.बी. कलंत्री यांनी शेतकऱ्यांना आकडेवारी सहित तुती लागवड कशी करावी याची सखोल माहिती दिली. तसेच उपसंचालक रेशीम सचांलनालय, नागपूर महेंद्र ढवळे यांनी अन्य पिकांशी तुलना करता कमी खर्चात अधिक उत्त्पन्न देणारा हा उद्योग असल्याचे सांगितले. यावेळी (वैज्ञानीक-सी) बी.एस.एम.टी.सी. केंद्रिय रेशीम मंडळ, भंडारा डॉ.प्रविण गेडाम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अर्चना कडू, वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, गोंदिया डॉ. सय्यद शाकीर अली यांनी देखील मार्गदर्शन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा डॉ.शेखर जाधव उपस्थित होते.

 

फक्त सरकारी अनुदानासाठी तुती रेशीम उद्योगाचा विचार न करता कायमस्वरूपी तुती लागवड, व्यवसायविकास व त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण देण्यास जिल्हा प्रशासन तयार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी सांगितले. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या या उद्योगा विषयी असणाऱ्या प्रश्नांचे समाधानही या वेळी तज्ञ मंडळीने केले. कार्यक्रमाचे संचलन तांत्रिक सहायक जितेंद्र सोरते, प्रास्तविक रेशीम अधिकारी अनिल ढोले यांनी केले. यावेळी बचतगट महिला, शेतकरी, उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मनरेगा व इतर योजनांचा लाभ कसा घेता येईल व तुती रेशीम शेती यशस्वी कशी करता येईल याबाबत संपूर्ण माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे या कार्यक्रमांचे youtube द्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.