एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कुल प्रवेशासाठी सुचना…

एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कुल प्रवेशासाठी सुचना

 

भंडारा दि.27: नागपूर विभागातील एकलव्य रेसिंडेशियल स्कुलमध्ये खैरीपरसोडा,बोरगाव बाजार , चामोर्शी,गेवर्धा,अहेरी,देवाडा,कोरची,भामरागड,एटापल्ली,धानोरा एकलव्य मॉडेल रेसिंडेशीयल स्कुल इयत्ता सहावी वर्गात नविन प्रवेश व इयत्ता सातवी ते इयत्ता नववीच्या वर्गातील विदयार्थ्याच्या रिक्त जागा भरणेकरीता . अर्जात वार्षिक परिक्षेच्या गुणांच्या आधारे एकुण प्राप्त् गुणांची परपुर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.कोणत्याही स्थितीत श्रेणी पध्दती स्विकृत केली जाणर नाही यांची नोंद घ्यावी.शैक्षणिक वर्ष 2022-2023 या सत्रातील व्दतिीय सत्राच्या एकुण गुणांची गुणपत्रिका जोडुन सर्व विदयार्थ्यानह व पालकांनी तसे मुख्याध्यापकांनी 15 फेब्रुवारी परिपुर्ण आवेदन अर्ज भरणे आवश्यक आहे. 15 फेब्रुवारीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 

या विदयाथी अनुसूचित जमातीचे असावा सक्षम अधिकारी यांचेकडुन प्राप्त दाखला जोडावा, सन 2022-23 या वर्षात पालकाचे सरासरी एकत्रित उत्पनन सहा लक्ष रूपयाचे आत असावी.प्रवेश अर्जासोबत बोनाफाईड सर्टीफीकेट जोडणे आवश्यक आहे.प्रवेश घेण्यापूवी पालकांन या कार्यालयात प्रवेशाबाबतचे संमती लिहून घ्यावे लागेल.पालकांचा रहीवासी दाखला,दारिद्रय रेषेखाली असल्यास तसा दाखला विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा.

 

प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी ,प्रकल्प आदिवासी विकास कार्यालय,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय,भंडारा,तुमसर,पवनी,लाखांदुर,लाखणी,साकोली अधिक माहिती करीता प्रकल्प अधिकारी,भंडारा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.