बाल न्याय निधी करिता अर्ज आमंत्रित

बाल न्याय निधी करिता अर्ज आमंत्रित

 

गडचिरोली, दि.23: कोविड -१९ या संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक बालकांवर अनाथ/एकपालक होण्याची वेळ आलेली आहे. कोविड-१९ मुळे अनाथ/एकपालक झालेल्या बालकाना मा.सर्वोच न्यायालयाकडून बाल न्याय निधीमध्ये रक्कम प्राप्त झालेली होती कोविड १९ मध्ये अनाथ/एकपालक झालेल्या बालकांना शालेय शुल्क,वसतिगृह शुल्क, शैक्षणीक साहित्य खरेदी या उद्देशासाठी निधीची गरज असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे सादर करण्यास सांगितले होते त्या नुसार १६२ प्रस्ताव सादर झाले असून त्या पैकी ११८ लाभार्थी बालकांना एकूण रक्कम १०,५०,३१२ रुपये आता पर्यंत वितरीत करण्यात आले आहे.

 

सध्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कोविड १९ मुळे अनाथ/एक पालक झालेल्या २७४ बालकांच्या नोंदी झालेल्या आहेत त्यापैकी १६२ अर्ज प्राप्त झालेत व ११८ लाभार्थी यांना लाभ वितरीत करण्यात आलेला आहे यापैकी उर्वरींत बाल न्याय निधीचा लाभ मिळण्या करिता अर्ज केला नाही त्यांनी त्वरित बाल न्याय निधीच्या लाभा करिता अर्ज सादर करावा.. अर्जाचा नमुना आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे.

 

अधिकच्या माहिती करिता आपल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय तथा सचिव तालुका समन्वय समिती (मिशन वात्सल्य) किवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६,२७ कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली दूरध्वनी क्र.-०७१३२-२२२६४५ येथे किंवा कवेश्वर लेनगुरे संरक्षण अधिकारी(संस्थात्मक) मो.क्र.९५९५६४४८४८ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा व पात्र लाभार्थी यांनी सदर योजेनेचा लाभ घेण्याचे आव्हान प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.