राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रशिक्षण शिबीर

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रशिक्षण शिबीर

 

चंद्रपूर २२ डिसेंबर – चंद्रपूर शहर महानगरपालिकाद्वारे दिनांक 21 डिसेंबर पासून दिवसीय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महिला आरोग्य समिती मधील अध्यक्ष व समिती सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन तीन दिवसीय प्रशिक्षण बजाज पॉलीटेक्नीक मध्ये घेण्यात येणार आहे.

यात तज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन केले जात असुन शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आभा कार्ड, इ गोल्ड कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, टीबी मुक्त अभियान, गोवर व रूबेला लसीकरण मोहीम तसेच एनसीडी कार्यक्रमांतर्गत मधुमेह व उच्च रक्तदाब इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मनपा आरोग्य विभागाद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे नियमित आयोजित करण्यात येतात.

या प्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, डॉ.अर्वा लाहिरी, डॉ.योगेश्वरी गाडगे, डॉ.प्राची खैरे,डॉ. नरेंद्र जनबंधु आशा वर्कर व महिला आरोग्य समिती मधील अध्यक्ष व समिती सदस्य उपस्थित होते